Sunday, January 21, 2018

🕉 *"अथर्वशीर्षाचा वैज्ञानिक अर्थ"* या विषयावर बोरीवली (प) येथे शनिवार दि. २०/०१/२०१८ या दिवशी माझे भाषण झाले. त्यातील काही भाग...

*"कलौ चण्डीविनायकौ"* कलियुगात देवी आणि गणेश यांची उपासना त्वरित फलदायी असते असे म्हणतात. गणेशोपासनेत श्री गणपत्यथर्वशीर्षाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अथर्ववेदातील सर्वोत्तम ज्ञान - शीर्षस्थानी विराजमान झालेले ज्ञान - ते *अथर्वशीर्ष* असे म्हटले जाते.

अथर्वशीर्ष या शब्दाची फोड अ थर्व शीर्ष अशीही केली जाते. अ अभावदर्शक, थर्व म्हणजे चंचल आणि शीर्ष म्हणजे डोके. चंचलपणाचा अभाव असलेले डोके म्हणजे शांत, स्थिर डोके. संकल्प-विकल्पांत रममाण होणारे मन निश्चयात्मक बुद्धीच्या साह्याने आटोक्यात आणण्यासाठी डोके शांत असले पाहिजे. ते साधणारी विद्या ज्यात आहे ते अथर्वशीर्ष.

ही विद्या गणेशलहरीद्वारे पृथ्वीतलावर प्रथमतः आली ती *माघ शुक्ल चतुर्थी* ला असे म्हणतात. या चतुर्थीचे नावच *"शांता चतुर्थी"* आहे. अशा शांता चतुर्थीच्या पूर्वसंध्येला माघ शुक्ल तृतीयेच्या आजच्या शुभदिवशी आपण अथर्वशीर्षाचे अध्ययन करू या.
                         क्रमशः...

No comments:

Post a Comment