अथर्वशीर्ष...३
सातव्या मंत्रात सुरुवातीला "गणादिं पूर्वमुच्चार्य..." आणि नंतर "गकार: पूर्वरूपम् |" असे शब्द आहेत. त्याचा दोन्ही ठिकाणी अर्थ 'ग' वाचनात आला होता, तो पटत नव्हता. द्विरुक्ति का? हा प्रश्न मनात होता. ती द्विरुक्ति नाही, हे लिपिकार श्री.ल.श्री.वाकणकर यांच्या लेखावरून ध्यानात आले.
गिरगांवातील केशवजी नाईकांच्या चाळींतील गणेशोत्सवाला १०० वर्षें पूर्ण झाली, त्यावेळी "सार्वजनिक गणेशोत्सव - शतकाची वाटचाल" या नावाची एक स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यात *"सा एषा गणेशविद्या"* हा श्री. वाकणकरांचा लेख होता. त्यात याचा उलगडा झाला.
आपली संस्कृत भाषा उच्चारानुसारी आहे. उच्चारानुसार लेखन हे तिचे वैशिष्ट्य आहे. इंग्रजीत लिहायचे "बी यू टी" आणि उच्चार "बट", असे संस्कृतात नाही. "गणेश" लिहिले तर उच्चारही "गणेश". देवतेच्या उपासनेत बीजमंत्राला महत्त्व असते. त्या बीजमंत्राचा उच्चार आणि लेखन कसे करावयाचे हे ७ व्या मंत्रात सांगितले आहे. प्रत्येक अक्षर मंत्र आहे, हे सांगणारा एक श्लोक आठवतो - "अमंत्रमक्षरं नास्ति..." श्री गणेशाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी "यं रं लं वं..." म्हटल्याचे आपल्याला आठवेल. ह्या अक्षरांना मंत्रस्वरूप कधी येते?
गणादिंचा अर्थ काय? उच्चारायचे ध्वनिगण कोणते? सनकादिक आचार्य शंकराकडे गेले. त्यावेळी नृत्यनिपुण शंकरांनी आपला डमरु *"नवपंचवारम्"* म्हणजे ९+५=१४ वेळां वाजवला. त्यातून माहेश्वरी सूत्रांची निर्मिती झाली.
कुंडलिनीतून उदय पावणारा ध्वनि - परा, पश्यंती, मध्यमा, वैखरी - तिथून कंठ, टाळू, दात, साह्यकारी जीभ आणि ओठ याद्वारे प्रकट होतो. ध्वनीच्या प्रकटीकरणानुसार मुख्य पाच गण केले गेले. कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य पाणिनीने त्यांना व्याकरणबद्ध केले, ते *'गण'*. हे गण पाडणारे ते 'गणक' ऋषि.
कोणत्याही बीजमंत्रासाठी गणादिं पूर्वं उच्चार्य - आधी गणाचा उच्चार करून - वर्णादिं तदनंतरम् | - नंतर वर्णादि 'अ' चा उच्चार करावा. अनुस्वार: परतर:| यानंतर अनुस्वार. अर्धेन्दुलसितम् | अर्धचंद्राकृतीने सुशोभित करावा. अर्धचंद्रांकित अनुस्वार ही संस्कृतमध्ये अनुनासिकाची खूण समजली जाते. तारेण ऋद्धम् | तार म्हणजे प्रणव, ॐकार. असा ॐकारयुक्त अनुनासिकासारखा अक्षराचा उच्चार मंत्ररूप होतो. एतत्तव मनुस्वरूपम् | हे तुझ्या मंत्राचे स्वरूप आहे.
नियम सांगून झाल्यावर आता विशिष्ट उदाहरण म्हणून *"ॐ गॅं"* या गणेश बीजमंत्राविषयी सांगितले आहे.
क्रमश:...

No comments:
Post a Comment