अथर्वशीर्ष...२
अथर्वशीर्षाच्या शेवटी *"इत्युपनिषत् |"* असा उल्लेख येतो, म्हणजे हे उपनिषद आहे. उपनिषद या शब्दामध्ये उप, नि व सद् अशी तीन पदे आहेत. उप म्हणजे जवळ, सद् म्हणजे बसणे आणि नि म्हणजे मनापासून किंवा भक्तिभावाने किंवा नम्रपणाने. अर्थात उपनिषद म्हणजे आत्मविद्या शिकण्यासाठी विधिपूर्वक गुरुच्या जवळ जाणे आणि भक्तिभावाने, नम्रपणे बसणे. अज्ञान नाहीसे करणारी ब्रह्मविद्या म्हणजे उपनिषद असा अर्थ जगद्गुरु स्वामी शंकराचार्यांनी सांगितला आहे.
अथर्वशीर्ष हे छोटेसे उपनिषद आहे. केवळ १४ मंत्रांचे आहे. त्यातही १० मंत्र मुख्य उपनिषद आणि ४ मंत्र फलश्रुतीचे आहेत. भाषा सोपी आहे. दोन दोन, तीन तीन शब्दांची वाक्ये आहेत. उदा. ऋतं वच्मि | सत्यं वच्मि | नमो गणपतये | इत्यादि. संस्कृत भाषा शिकविण्यासाठी अथर्वशीर्ष उत्तम आहे. आध्यात्मिक अर्थ मात्र गुरुमुखातून जाणून घेतला पाहिजे.
छोट्या वाक्यांत गहन अर्थ भरलेला आहे. एकेक संकल्पना समजून घेण्यासाठी मनन, चिंतनाची आणि त्याहून अधिक गुरुकृपेची आवश्यकता आहे. ज्ञानाबरोबरच ते ज्ञान टिकवून पुढच्या पिढीत संक्रमित करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या लेखनविद्येचे विज्ञानही यांत आहे.
तुलनात्मक दृष्ट्या आध्यात्मिक ज्ञानापेक्षा व्यावहारिक विज्ञान समजून घेणे सोपे आहे, आपल्या आवाक्यातले आहे, ते आधी पाहूं या. वेदांत ब्रह्मज्ञान अनेक सूक्तांत अभिव्यक्त झालेले आहे. *गणेशविद्या मात्र श्रीगणपत्यर्थशीर्षात आहे.* सध्याच्या शिक्षणप्रणालीनुसार शिकलेल्या आपणा सर्वांना ते समजेल असा मला विश्वास वाटतो.
गणेश उपासना प्रसंगी *"ॐ गॅं"* हा बीजमंत्र उपासनेसाठी ओल्या मृत्तिका इष्टिकेवर किंवा ताडपत्रावर किंवा भूर्जपत्रावर लिहिण्यासाठी स्पष्ट सूचना श्री गणपति अथर्वशीर्षांत ७व्या आणि ८व्या मंत्रांत दिल्या आहेत.
क्रमशः...

No comments:
Post a Comment